
पुणे,दि.१७ :- पुण्यात सेक्स तंत्र मंत्र शिबीराची सोशल मीडियावर अश्लिल जाहिरात करणार्या सत्यम शिवम सुंदरम फाऊंडेशनवर पुणे शहरांतील सामाजिक सुरक्षा विभागाने गुन्हा दाखल केला आहे.सत्यम शिवम सुंदरम ही उत्तर प्रदेशातील संस्था असून या संस्थेचा संचालक रवि प्रकाश सिंग (रा. प्र
सत्यम शिवम सुंदरम ही उत्तर प्रदेशातील संस्था असून या संस्थेचा संचालक रवि प्रकाश सिंग (रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. सेक्स तंत्र सत्यम शिवम सुदंरम फाऊंडेशन नवरात्री स्पेशल १ ते ३ ऑक्टोंबर ३ डेज २ नाईट फी १५ हजार रुपये प्रत्येकी त्यात फुड व निवास व्यवस्था अशी जाहिरात सोशल मीडियाचा माध्यमातून केली होती. त्यात अश्लिल फोटो छापण्यात आले होते.यात ऑनलाईन नोंदणीसाठी एक क्रमांक दिला होता. त्यात वैदिक सेक्स तंत्रासह चक्र अॅक्टिव्हेशन, ओशो मेडिएशन
या सारख्या विविध गोष्टी शिकविल्या जाणार असल्याचे त्यात नमुद करण्यात आले होते.या जाहिरात व्हाटसअॅपवर प्रसारीत झाल्याने पुणे शहर पोलीस वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सामाजिक सुरक्षा विभागाला चौकशीचे
आदेश दिले.होते व या जाहिरातीत दिलेल्या मोबाईलवर पोलीसांना संपर्क साधला असता त्याने रवि प्रकाश सिंग असे आपले नाव सांगितले.सत्यम शिवम सुंदरम फाऊंडेशन ही उत्तर प्रदेशात रजिस्टर केलेली संस्था असल्याचे सांगितले.
तसेच सोशल मीडियावर प्रसारित केलेली जाहिरात आपण केल्याचे मान्य केले.त्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाच्या महिला पोलीस अंमलदार मनिषा पुकाळे यांनी सायबर
पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस अधिकारी अधिक तपास करीत आहेत.