सांज दैनिक शक्ती झुंजारचा 25 वा वर्धापन दिन पुण्यात उत्साहात साजरा

सांज दैनिक शक्ती झुंजारचा 25 वा वर्धापन दिन पुण्यात उत्साहात साजरा

सध्याच्या काळातील घटस्फोटांचे प्रमाण चिंताजनक
तेली समाजाच्या  वधू वर सूचक मेळाव्यातील वक्त्यांचा सूर
घटस्फोट न होऊ देणे हे  कुटुंबाच्या  स्वास्थ्यासाठी गरजेचे

पुणे,दि.०४ :- सांज दैनिक शक्ती झुंजारचा २५ वा वर्धापन दिन तसेच  झुंजार न्यूज चैनल च्या ०५ वा वर्धापन दिन निमित्त सांज दैनिक शक्ती झुंजार  ई पेपरचे  उद्घाटन सांज दैनिक शक्ती झुंजार चे संपादक संतोष राम काळे यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण  यांच्या हस्ते ई पेपरचे उद्घाटन   करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील औंध येथील  पंडित भीमसेन जोशी सभागृह येथे करण्यात आले होते.या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस  निलेश मधुकर निम्हण,दैनिक  झुंजार चे संपादक संतोष काळे, पुणे बार असोसिएशनचे  रमेश धुमाळ,भारतीय जनता पक्षाचे सदस्य सचिन मानवतकर,पाषाणचे  युवा उद्योजक संतोष गायकवाड, रमेश भोज, आदी विविध सामाजिक, सांस्कृतिक,औद्योगिक  वैद्यकीय, विधी क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी  तेली समाजाचा झुंजारच्या वतीने ५ वा वधू वर मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी  घटस्फोट न होता सामंजस्याने कुटुंब व्यवस्था टिकावी, पती-पत्नी मधील नाते टिकावे दुभंगलेली मने एकत्र यावीत  असे मत विविध वक्त्यांनी  व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बोलताना  दैनिक झुंजार चे संपादक  संतोष काळे म्हणाले की, जीवावर उदार ठेवून पत्रकारिता करावी लागते. निर्भीड पत्रकारिता करायची असेल तर  संघर्षाचा सामना ही प्रसंगी करावा लागतो . आपल्या भाषणात बोलताना सनी विनायक निम्हण  म्हणाले की, " लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमांकडे पाहिले  जातं,गेल्या पंचवीस वर्षाच्या कार्यकाळात कायमच लोकहितासाठी जनसामान्यांच्या हक्कासाठी सांज दैनिक शक्ती झुंजारची भूमिका राहिली आहे. यापुढे वेळोवेळी जनसामान्यांचा हक्काचा आवाज म्हणून कार्यरत राहणे हा दृष्टिकोन मनात ठेवून संतोष काळे यांच्या झुंजार दैनिकाने  पुढील वाटचाल सुरू ठेवावी  असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा  सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन पत्रकार.  लक्ष्मण जाधव यांनी केले.